Announcement

महत्वाची सूचना

*आदरणीय पालक*
आशा आहे की आपण सर्व सुरक्षित आहात आणि स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहात. कोरोना चे अनपेक्षित संकट किती काळ टिकेल याबद्दल आपण सांगू शकत नाही, म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वसमावेशक/ व्यापक शिक्षणाचे कोणतेही मोठे नुकसान न करता आपण त्यावर मात करण्यासाठी नवीन मार्ग अवलंबले पाहिजेत असे आम्हाला वाटते. आम्ही अभ्यासक्रमाचे काही धडे प्रामुख्याने एप्रिल आणि मे च्या सुरूवातीस पूर्ण केले आहेत. ब्लॉसमने नेहमीच दर्जेदार अध्यापनासाठी कार्य केले आहे मग ते पारंपारिक वर्गात असो किंवा ई-शिक्षण वर्गात .सटाण्यात ई-लर्निंग सुरू करण्यात आम्ही अग्रेसर होतो. आता आमच्या मुलांच्या गरजा समजून घेत, शालेय स्तरावर आम्ही त्यांना सर्वोत्कृष्ट देण्याच्या काही सोप्या पद्धती शोधत होतो जेणेकरुन त्यांना अधिक चांगल्या प्रकारे अभ्यासक्रम समजेल. बर्‍याच ऑनलाइन प्रोग्राम्सची चाचणी करून घेतल्यानंतर आम्ही *फ्लिपलर्न अ‍ॅप* बरोबर जाण्याचे ठरविले आहे आणि *हे अॅप शाळेने विद्यार्थ्यांसाठी खरेदी केले आहे. शासनाचा निर्णय जो काही येईल, आपण मिळून त्याचे स्वागत करू. पण अभ्यासक्रमात घट झाल्यास विद्यार्थ्याचे नुकसान होईल कारण प्रत्येक वर्ष हे येणाऱ्या पुढच्या वर्षाचा पाया असतो म्हणून जरी अभ्यासक्रमात घट झाली तरीही मुलांना कंसेप्ट शिकवून आपण परीक्षेत मात्र धडे वगळू. मुलांचे कोणत्याही प्रकारे नुकसान आपण करणार नाही. या अ‍ॅपला शिक्षक सहाय्य आणि नियंत्रित करतील. निर्धारित वेळेत विद्यार्थी काय शिकतील हे शिक्षक ठरवतील. ह्या अॅप मध्ये *NCERT* पुस्तकांसोबत *असंख्य मॉड्यूल्स* आहेत जे आपल्या पाल्याला धडा उत्तमरित्या समजण्यासाठी मदत करतील. ह्याच बरोबर ह्या अॅप मधे *शिक्षक स्वतःची संसाधने* देखील वापरू शकतील. आणि प्रामुख्याने यात *इंटरैक्टिव मॉड्यूल्स* आहेत ज्यात मुले *ऑब्जेक्टिव टेस्ट देऊ शकतात* जेणेकरून आपल्याला आपल्या मुलाची एका विशिष्ट धडयाची *आकलन क्षमता समजेल.* याशिवाय आपल्या मुलांची प्रत्येक धड्यावरील टेस्ट जी शिक्षक नियोजित असेल तीसुद्ध मिळेल, जी तुम्ही नियोजित वेळेत देऊन *त्वरित टेस्टचा निकाल पाहु शकाल.* आम्हाला खात्री आहे की असा ऑनलाईन शिकवणीचा *उत्कृष्ट अनुभव आपण कधीही घेतला नसावा* कारण शिक्षक विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवतील. तुमच्या सोयीसाठी येत्या *जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्या पासून* हे अॅप आपण सुरु करत आहोत. तरी आपण जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्या पासून आपल्या पाल्याला ऑनलाइन learning साठी तयार ठेवायचे आहे. कृपया कोणतीही कारणे पालकांनी देऊ नये (उदाः तो/ती मामाच्या गावी गेलेत, किंवा आम्ही बाहेर गावी आलोत वगैरे.) तुमच्या 100% सहकार्याची अपेक्षा आम्ही करतोय व *तुम्हाला चांगल्या सुविधा देण्यासाठी management आपल्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.* कृपया शिक्षकांना सहकार्य करावे कारण तेसुद्धा कामाच्या वेळेपेक्षा अधिक वेळ कार्य करीत आहेत. जर तुमच्या मुलांचा स्क्रीन टाइम वाढतोय असं तुम्हाला वाटत असेल तर बाकी कामांसाठी मोबाईल चा वापर टाळावा. *टिप: आपण आपल्या मुलांना आपल्या सोयीने लॉकडाउन उघडल्यावर पाठयपुस्तके उपलब्ध करुन देऊ शकतात.* *ब्लॉसम*